अमरावतीतून अखेर तिकीट, नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'

अमरावतीतून अखेर तिकीट, नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, ‘त्यांच्या बापाची…’

| Updated on: Mar 27, 2024 | 10:59 PM

भाजपकडून अधिकृतपणे अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाली. दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनी खासदरा नवनीत राणा यांच्या लोकसभेच्या उमेदवारीला विरोध केला आहे. काय म्हणाले बच्चू कडू बघा व्हिडीओ

भाजपकडून अधिकृतपणे अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाली. दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनी खासदरा नवनीत राणा यांच्या लोकसभेच्या उमेदवारीला विरोध केला आहे. आपण नवनीत राणा यांचं काम करणार नाही. आम्ही नवनीत राणा यांचा शंभर टक्के प्रचार करणार नाहीत. नवनीत राणा यांच्यासाठी ही लढत तेवढी सोपी राहणार नाही. याचा रिझल्ट नक्कीच दिसेल. आम्ही नवनीत राणा यांना शंभर टक्के पाडणार, असं थेटच भाष्य बच्चू कडू यांनी केलं. तर आम्ही आता विरोधात प्रचार करुन त्यांना महायुतीत ठेवायचं किंवा न ठेवायचं हा त्याचा प्रश्न आहे. आता काम सरो वैद्य मरो अशी अवस्था आहे. त्यांना असं वाटतंय की आमची काही गरज नसेल तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना एकंदरीत आमची गरज नाही. त्यामुळे आम्ही लाचारी पत्कारणार नाही, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 27, 2024 10:59 PM