तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
नवनीत राणा यांच्या विरोधात तगडा उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. तर लवकरच याची घोषणा बच्चू कडू यांच्याकडून होणार असल्याचे सांगितले जात आहे. आपण अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार देण्यावर ठाम असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले तर ‘वेळ पडल्यास महायुतीमधून बाहेर पडू, पण....', काय म्हटले बच्चू कडूंनी?
अमरावतीतून भाजपने खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. मात्र यावरून काही नेत्यांमधून नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. अशातच खासदार नवनीत राणा यांना बच्चू कडू यांनी कडाडून विरोध केल्याचे पाहायला मिळत आहे. तर नवनीत राणा यांच्या विरोधात तगडा उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. तर लवकरच याची घोषणा बच्चू कडू यांच्याकडून होणार असल्याचे सांगितले जात आहे. आपण अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार देण्यावर ठाम असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले तर ‘वेळ पडल्यास महायुतीमधून बाहेर पडू, पण उमेदवार मागे घेणार नाही’ असा थेट इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला आहे. ‘अमरावतीचा खासदार सर्वांना सोबत घेऊन जाणारा पाहिजे, खासदार कोणत्याही गोष्टीचं क्रेडिड घेणारा नसावा, शिंदे यांचा मी आदर करतो, मान ठेवतो पण आताची निवडणूक ही प्रहार पक्षाच्या दृष्टीने अस्तित्वाची लढाई आहे. शिंदे साहेब आणि आमची दोस्ती आहे, आमची मैत्री तुटू नये अशीच आमचीही इच्छा आहे. पण जर आमच्यामुळे एकनाथ शिंदे यांना त्रास होत असेल, तर त्यांनी स्पष्ट सांगावं. आम्ही उमेदवारी तर मागे घेणार नाही, पण तशीच वेळ आली तर आम्ही युतीतून बाहेर पडू’, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिलाय.