तर मराठ्यांना ओबीसीत जाण्याची गरज नाही, बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यावर ठाम आहेत. इतकंच नाहीतर सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी अल्टिमेटमवर अल्टिमेट दिल्याचेही पाहायला मिळत आहे. मात्र सरकारने आरक्षणाबाबत कोणताही ठाम निर्णय घेतला नाही. अशातच आमदार बच्चू कडू यांनी मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य केले आहे
मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यावर ठाम आहेत. इतकंच नाहीतर सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी अल्टिमेटमवर अल्टिमेट दिल्याचेही पाहायला मिळत आहे. मात्र सरकारने आरक्षणाबाबत कोणताही ठाम निर्णय घेतला नाही. अशातच आमदार बच्चू कडू यांनी मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य केले आहे. मराठा आरक्षणाच्या वादावरून राजकीय पंचायत सध्या निर्माण झाली आहे. ती जाणीवपूर्वक निर्माण केली अशी सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अवस्था असल्याचे बच्चू कडू म्हणाले. पुढे बच्चू कडू असेही म्हणाले की, आरक्षणाचा मुद्दा हा वास्तविक लहान प्रश्न होता पण राजकीय काही नेत्यांनी आरक्षणाचा मुद्दा किंवा प्रश्न फार मोठा केला आहे. त्यावर पडदा पडणं आवश्यक आहे, असेही मत त्यांनी मांडले. पुढे बच्चू कडू असेही म्हणाले की, मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि ते कोर्टात टिकलं तर मराठ्यांना ओबीसी समाजात जाण्याची गरज नाही, असं मोठं वक्तव्य बच्चू कडू यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर केलं आहे.