'भूक मंत्रीपदाची नाही तर...', शिवसेनेच्या आमदारानं नाराजीच्या मुद्यावर विरोधकांना स्पष्टच सुनावलं

‘भूक मंत्रीपदाची नाही तर…’, शिवसेनेच्या आमदारानं नाराजीच्या मुद्यावर विरोधकांना स्पष्टच सुनावलं

| Updated on: Apr 10, 2023 | 9:19 PM

VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप, तर नाराजीच्या मुद्यावर शिवसेनेच्या नेत्यानं विरोधकांना फटकारले

अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदार आणि खासदारांसबोत अयोध्या दौरा केला. मात्र त्या दौऱ्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. तर या अयोध्या दौऱ्याला काही आमदार आणि खासदार हजर नव्हते त्यावरून विरोधकांनी या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, शिवसेनेच्या आमदारानं नाराजीच्या मुद्यावर विरोधकांना स्पष्टच सुनावलं आहे. काही आमदार दौऱ्यावर गेले नसल्याने त्यांच्याबद्दल उलटसुलट आता चर्चा होत असताना प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी अयोध्या दौऱ्यावर न जाण्याचे कारण सांगितले, ते म्हणाले, राम प्रभुबद्दल मला प्रचंड आस्था आहे. अयोध्या दौऱ्यावर जाण्याची माझीही इच्छा होती.पण बाजार समितीच्या निवडणूक असल्यामुळे मी जाऊ शकलो नाही. मी नाराज नाही नाराजीचे कुठलेच कारणही नाही, मात्र मंत्रिमंडळाचा आता विस्तार होणारच नाही हा विस्तार आता 2024 नंतरच होणार आहे. सध्या मंत्री या विषयापेक्षा आता कामं महत्त्वाची आहेत. त्यामुळे आम्हाला भूक मंत्रीपदाची नाही तर विकास कामाची आहे अशा शब्दात त्यांनी नाराजीची टीका करणाऱ्यांना त्यांनी उत्तर दिले आहे.

Published on: Apr 10, 2023 09:19 PM