गरीबाची पोरगी गेली तर पयाली अन् श्रीमंताची गेली तर Love Marriage? गुवाहटीला जाण्याचं समर्थन बच्चू कडूंनी कसं केलं…

आम्ही गुवाहटीला गेलो, यात फार काही वेगळं केलं नाही, असं स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिलं. 

गरीबाची पोरगी गेली तर पयाली अन् श्रीमंताची गेली तर Love Marriage? गुवाहटीला जाण्याचं समर्थन बच्चू कडूंनी कसं केलं...
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 3:22 PM

अमरावतीः गुवाहटीला (Guwahati) जाणारे आमदार म्हणजे पैसे खाणारे आमदार असे आरोप वारंवार केले जात आहेत. हे आरोप मोडून काढताना बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी याआधी महाराष्ट्रात तसेच देशात कशी बंडखोरी (Rebel) झाली, कसे उठाव झाले, याचे दाखले दिले. अमरावतीत आमदार प्रहार जनशक्ती संघटनेच्या भव्य मेळाव्याला आमदार बच्चू कडू यांनी संबोधित केलं.

भाजप आमदार रवी राणा यांच्या खोक्यांच्या आरोपांमुळे कार्यकर्ते आणि स्वतः बच्चू कडू दुखावले असून तो राग व्यक्त करण्यासाठी हे शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. भाषणादरम्यान बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्ष किती खस्ता खास पुढे आला. एका लहानशा कार्यालयापासून पक्षाची इमारत कशी उभी राहिली, याचा इतिहास सांगितला.

अंधांचे हात बनलो, अपंगांचे पाय बनलो आणि हळू हळू जनतेचा प्रतिनिधी म्हणून उभा राहिलो. याच पक्षानं शिंदेंसोबत जायचं ठरवल्यावर त्यांच्यावर आरोप केले जातात, हे चुकीचं असल्याची भूमिका बच्चू क़डू यांनी मांडली. ते म्हणाले, ‘ तत्व पाळत बसलो आणि काहीच ताकद लावली नाही, असं नाही. राजकारणात हे करावंच लागलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही केलं होतं. त्या वेळी काँग्रेस हे जळतं घर आहे, काँग्रेससोबत मैत्र म्हणजे मुंगूस आणि सापाची मैत्री म्हटलं जात होतं. पण बाबासाहेबांचं तत्त्व महत्त्वाचं होतं. राजकारणाचं तत्त्व महत्त्वाचं आहे. शेवटच्या घटकाच्या स्वातंत्र्यासाठी जळत्या घराशी मैत्री केली. संविधान समिती स्थापन केली आणि घटनेसारखं मोठं शस्त्र तुमच्या हाती दिलं… हा दाखला बच्चू कडू यांनी दिला.

पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, ‘ निर्णय कडू असतो, काम गोड करता आला पाहिजे. छत्रपती शिवरायांनी किती डाव तह केले. रयतेचं राज्य अधिक मजबूत करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या पिकाना शत्रूचा हात लागता कामा नये, यासाठी छत्रपतींनी आपली तलवार म्यानेतून बाहेर काढली पण अनेकांशी तडजोडी केल्या. याला काय बंडखोरी म्हणायची?’

‘शरद पवारांनी 2014मध्ये भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. तो त्यांच्या सोयीचा होता. पण ते म्हणतात ना… गरीबाची पोरगी पळून गेली तर पयाली.. .अन् श्रीमंताची गेली तर लव्ह मॅरेज होतं..’

आमचा लहान पक्ष आहे. छोटे है लेकिन दिलदार आहे. नाव बच्चू जरू असेल, आडनाव कडू असलं तरी एवढा गोड आहे… कितीही खाल्लं तरी शूगर नाही… म्हणून हे परिवर्तन चालत राहतं… आम्ही गुवाहटीला गेलो, यात फार काही वेगळं केलं नाही, असं स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिलं.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.