“वजन वापरावं लागेल, फक्त दादा बोलून…”; बच्चू कडू यांनी का दिला दादा भुसे यांना सल्ला?
राज्याचं सध्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. याअधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र शकुंतला एक्सप्रेस या मुद्द्यावरून सरकारमधील नेत्यांमध्येच खडाजंगी पाहायला मिळाली.
मुंबई, 04 ऑगस्ट 2023 | राज्याचं सध्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. याअधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र शकुंतला एक्सप्रेस या मुद्द्यावरून सरकारमधील नेत्यांमध्येच खडाजंगी पाहायला मिळाली. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी शकुंतला एक्सप्रेस केंद्राच्या ताब्यात गेल्यापासून बंद असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी मंत्री दादा भुसे यांना सल्लाही दिला. महाराष्ट्राचं वजन दिल्लीत किती हे पुन्हा तपासण्याची गरज आहे, फक्त दादा बोलून चालणार नाही, असं बच्चू कडू म्हणाले. यावर दादा भुसे यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने पाठपुरावा केला जाईल, असं सांगितलं.
Published on: Aug 04, 2023 07:35 AM