Bachchu Kadu Video : औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं… लाडक्या बहिणीच्या भावाला लुटलं, बच्चू कडूंची सरकारवर नाराजी
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू उद्यापासून 3 दिवस अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहेत, अशी माहिती देत प्रहारचे माजी आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली.
औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यभरात वाद सुरू असताना राज्यात आणि देशात हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनत चालला का? असा सवाल प्रहार संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार बच्चू कडू यांना केला असता त्यांनी यावर थेट भाष्य केलं. ‘औरंगजेबाच्या कारकिर्दीत जेवेढे लोकं मारले गेले नसतील त्यापेक्षा जास्त साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. कमल कसाई या धोरणामुळे हिंदू शेतकरी मेला पण या हिंदूंना त्याची लाज नाही. हिंदू धर्माला पोट असतं. हे भाजपवाले विसरले असल्याचे दिसतंय.’, असं म्हणत भाजपवर निशाणा साधलाय. तर ‘राजकारणात आमदार जास्त आले म्हणजे पक्ष मोठा असे होत नाही. आमचे विचार मोठे आहे. निवडणुकीच्यावेळी कर्जमाफी करण्याचा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी रामाची शपथ घेऊन दिला होता. त्यासाठी तीन दिवस रायगडावर अन्न त्याग आंदोलन असणार आहे. इथून शक्ती घेऊन महाशक्तीत आम्ही दिव्यांग, शेतकरी यांच्यासाठी आम्ही लढणार आहे’, अशी माहिती बच्चू कडूंनी आज विधिमंडळाच्या अधिवेशनावेळी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या

नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया

तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
