Bacchu Kadu | चुलीत गेलं मंत्रीपद, उद्या राजीनामा फेकतो, मिटकरींच्या आरोपांवर बच्चू कडू कडाडले
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्यमंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यावर भाजपच्या आमिषाला बळी पडल्याचा आरोप केला. त्यावर बच्चू कडू यांनी आमिष घेतल्याचं सिद्ध करा, राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो, चुलीत गेलं ते राजकारण असा हल्लाबोल केला.
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्ष काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वतंत्र लढले. भाजपने या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरल्याचा दावा केला आहे. तर महाविकास आघाडीही आपणच मोठी आघाडी ठरल्याचा दावा केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्यमंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यावर भाजपच्या आमिषाला बळी पडल्याचा आरोप केला. त्यावर बच्चू कडू यांनी आमिष घेतल्याचं सिद्ध करा, राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो, चुलीत गेलं ते राजकारण असा हल्लाबोल केला. आमिषाला बळी पडल्याचं सिद्ध करा, उद्या राजीनामा फेकतो, मला गरज नाही त्याची असं बच्चू कडू म्हणाले.
Latest Videos