Amaravati | सरकारनं एक तरी पारदर्शक काम करावं’, Bacchu Kadu यांचा राज्य सरकारला घरचा आहेर
आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यानंतर आता शाळेय शिक्षण राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिलाय. बच्चू कडू यांनी आरोग्य विभागाच्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारनं किमान हे एक तरी पारदर्शक काम करावं अशा शब्दात बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर बोट ठेवलं आहे. bachchu kadu Exam confusion Examinations health department
आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यानंतर आता शाळेय शिक्षण राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिलाय. बच्चू कडू यांनी आरोग्य विभागाच्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारनं किमान हे एक तरी पारदर्शक काम करावं अशा शब्दात बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर बोट ठेवलं आहे.
आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षांतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मागील वेळी परीक्षा रद्द करून परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. तर आता 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षेतही गोंधळ उडाला आहे. परीक्षा पुढे ढकलूनही नियोजनातील गोंधळाबाबत उमेदवारांकडून तीव्र संताप करण्यात येत आहे. यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावतीत माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. राज्य सरकारनं किमान एक तरी पारदर्शक काम करावं, अशी खोचक प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिलीय. आरोग्य विभागाच्या परीक्षेत दोन वेळा घोळ होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. तरीही न्यासा कंपनीला पुन्हा परीक्षेचं काम दिल्याची खंत आहे. ज्या कंपनीने घोळ केला तरी त्यांना काम द्यायचं कारण काय? असा सवालही बच्चू कडू यांनी यावेळी विचारला आहे.