“मंत्रिपदाचा दावा आजच सोडणार होतो, पण…”, बच्चू कडू यांनी स्पष्ट केली भूमिका
राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्तारावरून मोठ्या घडामोडी घडत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारावरून अनेक इच्छुक आमदार आस लावून बसले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार आज होईल, उद्या होईल अशी अपेक्षा ते करत आहेत. मात्र अस असताना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिपदाचा दावा सोडणार असल्याचं सांगितलं.
अमरावती: राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्तारावरून मोठ्या घडामोडी घडत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारावरून अनेक इच्छुक आमदार आस लावून बसले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार आज होईल, उद्या होईल अशी अपेक्षा ते करत आहेत. मात्र अस असताना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिपदाचा दावा सोडणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, “मी मंत्रिपदावर आजच दावा सोडणार होतो. पत्रकार परिषद घेऊन तसं जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. पण मुख्यमंत्री सातत्याने फोन करत होते. अर्ध्या तासापासून त्यांचे फोन सुरू होते. आज मंत्रिपदाचा दावा सोडू नको. फक्त मला भेटून निर्णय घे. त्यांनी मला 17 ला भेटायला सांगितलं आहे. मला भेट आणि हवं तर 18 तारखेला निर्णय घे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे मी त्यांना 17 तारखेला त्यांना भेटणार आहे. चर्चा झाल्यावर मग 18 ला निर्णय घेणार आहे.”