पावसामुळे पुणे-सातारा महामार्गाची दुरावस्था, रस्त्यांची वाईट अवस्था अन् वाहनचालक हैराण
VIDEO | भरमसाठ टोल भरूनही रस्त्यांची वाईट अवस्था, वाहन चालकांची महामार्ग प्रशासनावर नाराजी...रस्त्यांवर ठिक-ठिकाणी खड्डे आणि चिखलाचं साम्राज्य
पुणे, ४ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पुणे सातारा महामार्गाची दुरावस्था झाली आहे. मुख्य रस्ता आणि सर्व्हिस रस्त्यांवर खड्डे आणि चिखलाचं साम्राज्य पहायला मिळतंय. या मार्गावरील केळवडे, नसरापूर या दरम्यान मुख्य रस्ता आणि सर्व्हिस रस्त्यादरम्यान ठिक ठिकाणी वाहन चिखलात खचत असल्याच्या घटना घडतायत. त्यामुळे वाहनांच मोठं नुकसान होतंय. महामार्गाच्या दुरावस्थेमुळं वाहनचालक हैराण झालेत. भरमसाठ टोल भरूनही रस्त्यांची वाईट अवस्था असल्यानं वाहन चालकांनी महामार्ग प्रशासनावर नाराजी व्यक्त केलीय. नुकताच पुणे सातारा महामार्गावर एसटी बसचा अपघात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झाला होता. पुणे सातारा महामार्गावर किकवी येथे एसटी बस आणि दुचाकीला भीषण अपघात झाला, या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.राज्य परिवहन महामंडळाची बस पुण्याहून सातारच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला .रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. त्यामध्ये एक जण जखमी देखील झाला असून या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.शंकर शिंदे ( वय ४८, रा. नावेचीवडी वाई) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर रमेश चव्हाण, हा त्याच्यासोबत दुचाकीवर असणारा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. एस टी चालक परशुराम सदाशिव पाटील वय 31 (रा. कोलोली ता. पन्हाळा जि. कोल्हापूर) यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.