Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्त्याची दुरावस्था, वाहनधारकांचं अनोखं आंदोलन; खड्यांभोवती फुलांची सजावट अन्...

रस्त्याची दुरावस्था, वाहनधारकांचं अनोखं आंदोलन; खड्यांभोवती फुलांची सजावट अन्…

| Updated on: May 03, 2023 | 3:15 PM

VIDEO | तुळजापूरला जोडणाऱ्या माढा वैराग मार्गाच्या दुरावस्थेवर वाहनधारकांचं अनोखं आंदोलन, बघा व्हिडीओ

सोलापूर : श्री क्षेत्र तुळजापुरला जोडल्या जाणाऱ्या माढा वैराग मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. माढ्यात शंभु साठे यांच्या नेतृत्वाखाली वाहनधारकांनी रास्ता रोको आंदोलन केले आणि या मार्गावर पडलेल्या खड्यावर फुलांची उधळण करीत खड्ड्यांवर रांगोळी घातली. माढ्यातील सम्राट पेट्रोल पंपासमोर नागरिकांनी एकत्रित येऊन आक्रमक पवित्रा घेतला. मंगळवारी सकाळी जवळपास दोन तास रास्ता रोको आंदोलन करुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आनंद नाझरे यांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली. श्री क्षेत्र तुळजापूरला जोडला जाणारा माढा वैराग हा मार्ग असल्याने दररोज वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्यांची गेल्या अनेक महिन्यांपासून दुरावस्था झाल्याने सर्व सामान्य नागरिकांसह वाहनधारकांची गैरसोय होत आहे. खड्डे हुकवतच जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या समस्येप्रश्नी शंभु साठे यांनी पुढाकार घेऊन वाहनधारकांसह शहरवासियांना एकत्रित घेऊन रास्ता रोको करत निषेध नोंदवला आहे.

Published on: May 03, 2023 03:15 PM