Akshay Shinde Encounter Hearing : ‘हे पूर्णपणे न पटण्यासारखं…’, मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं
आरोपीने पिस्तूल की रिव्हॉल्वर कशामधून गोळी मारली? आरोपीने पिस्तुलचे लॉक उघडून ते लोड करून फायर केले का? सामान्य व्यक्तीला स्लायडर मागेही खेचता येणार नाही? तुम्ही कधी ते चालवलंय का? असे अनेक सवाल कोर्टाने केलेत. त्यावर पिस्तुल कशी फायर केली याबाबत वकिलांकडून स्पष्टीकरण देण्यात आले.
पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला असल्याचा दावा केला जात आहे. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यात दोन पोलीस जखमी झाले. स्व:संरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागली आणि त्यानंतर अती रक्तस्त्राव झाला, असे अक्षय शिंदेच्या शवविच्छेदन अहवालातून समोर येत आहे. दरम्यान, अक्षय शिंदेंच्या आई-वडिलांनी हायकोर्टात याप्रकरणी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली. मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील हितेन वेणूगावकर यांनी कोर्टात राज्य सरकारची बाजू मांडली. मात्र तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पटत नाही, असं म्हणत मुंबई हायकोर्टाने सरकारी वकिलांना चांगलंच फटकारल्याचे पाहायला मिळाले.

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?

ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा

पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?

'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
