Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या दफनविधीला विरोध, मृतदेहाचं काय होणार? कोर्टाने काय दिले आदेश?

अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी अनेक ठिकाणी विरोध होत आहे. त्यामुळे त्याच्या पालकांनी हायकोर्टात धाव घेतली होती. यावर हायकोर्टात सुनावणी पार पडली. राज्य सरकारकडून अक्षय शिंदेच्या आई वडिलांना पूर्णपणे सहकार्य केले जात आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले.

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या दफनविधीला विरोध, मृतदेहाचं काय होणार? कोर्टाने काय दिले आदेश?
| Updated on: Sep 27, 2024 | 2:54 PM

बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून दोन दिवसांपूर्वी एन्काऊंटर करण्यात आला.तर आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यामध्ये दोन पोलीस जखमी झाले. पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. मात्र मृत्यूनंतर कुटुंबियांनी अक्षयच्या दफनविधीसाठी जागा मिळत नसल्याने त्यांची वणवण सुरू आहे. कळवा आणि बदलापूरमध्येही जागा मिळत नसून आरोपी अक्षय शिंदेला दफन करण्यासाठी विरोध होत आहे. दरम्यान, सोमवारपर्यंत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करा, असे आदेश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. जागा उपलब्ध करून देण्याचे हायकोर्टाने सरकारला आदेश दिले आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जमीन देण्यास तीन ठिकाणी विरोध करण्यात आला आहे. यानंतर आरोपी अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी याबद्दल हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर आता सुनावणी पार पडली. यावेळी वकील अमित कटाकनवरे यांनी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांचे बाजू कोर्टात मांडली. या सुनावणीवेळी आरोपी अक्षय शिंदेचे आई-वडीलही कोर्टात उपस्थित होते.

Follow us
अक्षयच्या दफनविधीला विरोध, मृतदेहाचं काय होणार? कोर्टाचे आदेश काय?
अक्षयच्या दफनविधीला विरोध, मृतदेहाचं काय होणार? कोर्टाचे आदेश काय?.
दिघेंचं नाव घेण्याची लायकी या विषारी सापात...भाजप नेत्याची टीका
दिघेंचं नाव घेण्याची लायकी या विषारी सापात...भाजप नेत्याची टीका.
फडणवीस धर्मवीर 3 ची पटकथा लिहीणार? राऊत म्हणताय, त्यांनी 'गोलमाल'....
फडणवीस धर्मवीर 3 ची पटकथा लिहीणार? राऊत म्हणताय, त्यांनी 'गोलमाल'.....
फडणवीसांच्या कार्यालयची तोडफोड अन् नुकसान, महिलेनं का घातला गोंधळ?
फडणवीसांच्या कार्यालयची तोडफोड अन् नुकसान, महिलेनं का घातला गोंधळ?.
महिलांनो...अजूनही वेळ गेलेली नाही, 'लाडकी बहीण योजने'बाबत मोठी माहिती
महिलांनो...अजूनही वेळ गेलेली नाही, 'लाडकी बहीण योजने'बाबत मोठी माहिती.
शिवरायांचा पुतळा कोसळला कसा? ही 4 कारण समोर, स्थानिक म्हणत होते ते खरं
शिवरायांचा पुतळा कोसळला कसा? ही 4 कारण समोर, स्थानिक म्हणत होते ते खरं.
अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कार नाही, दफनविधीला विरोध, कुटुंबियांची वणवण
अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कार नाही, दफनविधीला विरोध, कुटुंबियांची वणवण.
'डर्टी डझन'चा शेकहँड, शाह अन् मुश्रीफ यांच्या भेटीवरून सुळेंचा निशाणा
'डर्टी डझन'चा शेकहँड, शाह अन् मुश्रीफ यांच्या भेटीवरून सुळेंचा निशाणा.
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन.
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?.