अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट, ‘त्या’ पोलिसांवरच गुन्हा दाखल करा, हायकोर्टाचे थेट आदेश
बदलापूर अत्याचार प्रकरणी एन्काऊंटर झालेल्या अक्षय शिंदे प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई हायकोर्टाने या संदर्भात राज्य सरकारला मोठा दणका दिला आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात राज्यसरकारला हायकोर्टाकडून मोठा दणका मिळाला आहे. दरम्यान, अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी आरोप करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेशच हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. हायकोर्टाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर आता अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाता पुढील तपास मुंबई गुन्हे शाखेकडून केला जाणार आहे. मुंबईचे गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्या नेतृत्वात एक विशेष तपास पथक स्थानप केले जाणार आहे. या तपास पथकांतर्गत अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटचा तपास करण्यात येणार आहे. यासोबत कोर्टाने पोलिसांवरच गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले असले तरी या निकाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यास राज्य सरकारला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात पुढे काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे

पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?

इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण

सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक

एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्
