‘जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय’; बदलापूरच्या माजी नगराध्यक्षाची महिला पत्रकाराला अर्वाच्य भाषा, ‘ती’ रणरागिणी Tv9 मराठीवर

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराला वापरलेल्या अर्वाच्य भाषेचा आणि असंवेदनशील वक्तव्याचा निषेध केला जात आहे. बदलापूर येथील एका नामांकित शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचं वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकार महिलेला वामन म्हात्रे यांनी तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे, अशी अशोभनीय भाषा वापरलयाचे पाहायला मिळाले.

'जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय'; बदलापूरच्या माजी नगराध्यक्षाची महिला पत्रकाराला अर्वाच्य भाषा, 'ती' रणरागिणी Tv9 मराठीवर
| Updated on: Aug 21, 2024 | 3:52 PM

बदलापूर येथील शालेय अल्पवयीन मुलींवर शाळेतीलत सफाई कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. काल दिवसभर सुरू असलेल्या बदलापूरातील आंदोलनाचं वार्तांकन करत असताना वामन म्हात्रे यांनी अर्वाच्य भाषा वापरून संवाद साधल्याचा आरोप महिला पत्रकार मोहिनी जाधव यांनी केला आहे. बदलापुरातील ज्या शाळेत घटना घडली त्या ठिकाणी पत्रकार असणाऱ्या मोहिनी जाधव जात होत्या. त्याच रस्त्यात त्यांना वामन म्हात्रे भेटले. बदलापूर शहराचे माजी नगराध्यक्ष असलेले वामन म्हात्रे मोहिनी जाधव यांना पाहून थांबले आणि हे प्रकरण तुम्ही पत्रकारांनी पेटवले असल्याचे बोलू लागले. यावेळी त्यांनी मोहिनी जाधव यांना जसं काही तुझ्यावरच बलात्कार झालाय, अशा बातम्या देत आहेस अशी भाषा वापरली. त्यानंतर त्यांना त्यांचे शब्द खटकले आणि तिने थेट पोलीस स्टेशन गाठले मात्र पोलिसांनी देखील या संदर्भातील तक्रार नोंदवून घेतली नसल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, वामन म्हात्रे यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे, इतकंच काय तर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील या महिला पत्रकाराचे समर्थन केले आहे.

Follow us
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.