संजय राऊत आज बाहेर येणार का? ED ची ‘ती’ याचिकाही कोर्टाने फेटाळली!

कोर्टाचे आदेश आणि त्यासंबंधीचे पेपर्स आर्थर रोड तुरुंगात आज पोहोचले तर संजय राऊत यांची आजच सुटका निश्चित आहे.

संजय राऊत आज बाहेर येणार का? ED ची 'ती' याचिकाही कोर्टाने फेटाळली!
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 3:28 PM

कृष्णा सोनारवाडकर, मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. शिवसेना ठाकरे(Thackeray) गटाच्या वतीने या सुनावणीनंतर राज्यभर जल्लोष होतोय. मात्र संजय राऊत बाहेर कधी येणार, हा प्रश्न सर्वांना पडलाय. यापुढील न्यायालयीन प्रक्रिया काय आहे, याबाबत लवकरच खुलासा होणार आहे. पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत हे मास्टर माइंड आहेत, असा ईडीचा (ED) आरोप आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या जामीनाविरोधात ईडी आता हायोकोर्टात जाण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ईडीच्या वकिलांनी सत्र न्यायालयात जमीनाला स्थगिती देण्याची मागणी केली . ईडीच्या वकिलांनी विशेष पीएमएलओ कोर्टात ही मागणी केली . मात्र जामीनाला स्थगिती देण्याची मागणी कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे संजय राऊत आजच जेलमधून बाहेर येण्याची दाट शक्यता आहे.

कोर्टाचे आदेश आणि त्यासंबंधीचे पेपर्स आर्थर रोड तुरुंगात आज पोहोचले तर संजय राऊत यांची आजच सुटका निश्चित आहे. कोर्टातून ही सगळी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्याची शक्यता आहे. पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी 31 जुलै रोजी संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना ईडीच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. संजय राऊत यांच्या जामीनासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. अखेर विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला. कोर्टाने 2 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना सोडण्याचे आदेश दिले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.