Special Report | ‘जय बंजरंगबली बोलो, मतदान करो’, कर्नाटकच्या प्रचारात बजरंगबलीची एन्ट्री
VIDEO | कर्नाटक प्रचारात बजरंगबलीची एंट्री कशी झाली? पंतप्रधान मोदी म्हणाले, जय बंजरंगबली बोलो... बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : कर्नाटकच्या प्रचारात बजरंगबलीची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात बंजरंग दलावर बंदी घालू असे सांगितले आणि कर्नाटकचा प्रचार जय बंजरंगबलीवरून तापला. कर्नाटकची निवडणूक आता बंजरंग दलाच्या दिशेने आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंगबली म्हणा आणि मतदान करा असं आवाहनच केले आहे. कर्नाटक प्रचारात बजरंगबलीची एंट्री कशी झाली? तर काँग्रेसने बंजरंग दलाची तुलना पीएफआयशी केली आणि बंजरंगदलावर बंदी घाण्याचं आश्वासन दिलं आणि इथून प्रचार बंजरंगबलीच्या दिशेने सुरू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय बजरंगबलीच्या घोषणा दिल्यानंतर एमआयएमच्या ओवीसींनी अल्लाह हूं अकबरचा नारा दिलाय. कर्नटकातील प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. सीमाभागात प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप, काँग्रेस आणि ठाकरे गटाचे नेतेही बेळगावात येतायेत. मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्रातील नेत्यांना टार्गेट केल्याचे पाहायला मिळत आहे. बघा स्पेशल रिपोर्ट…