Sanjay Raut | बाळासाहेबांनी जाहीर सभेत संभाजीनगर नाव केलेलं : संजय राऊत
बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः जाहिरसभेत औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण केलंय, आता हळूहळू सरकारी कागदपत्रांमध्येही नाव येतंय, ज्या अधिकाऱ्यांनी जीआरमध्ये हे नामकरण केलं, त्याचा सत्कार करायला हवा, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.
जीआरमध्ये औरंगाबादचं संभाजीनगर नाव, याचं स्वागत आहे. घोषणादेखील होईल, कालपर्यंत काही लोक आम्हाला आव्हान देत होते, औरंगाबादचं संभाजीनगर करून दाखवा, कधी झालं त्यांना हे कळलंचं नाही. एमआयएमचं ऐकून राज्य चालत नाही, एमआयएमचा आणि औरंगाबादचा संबंध काय? बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः जाहिरसभेत औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण केलंय, आता हळूहळू सरकारी कागदपत्रांमध्येही नाव येतंय, ज्या अधिकाऱ्यांनी जीआरमध्ये हे नामकरण केलं, त्याचा सत्कार करायला हवा, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.
Latest Videos