छगन भुजबळ यांच्या मनात अजूनही शिवसेना? स्पष्टच म्हणाले, माझ्या मनातून…
VIDEO | शिवसेना कधीही संपणार नाही, छगन भुजबळ यांनी सांगितले कारण..., बघा काय म्हणाले शिवसेनेबद्दल...
नांदेड : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवानिमित्ता नांदेडमध्ये त्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी भुजबळांची प्रकट मुलाखत झाली. ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी भुजबळांची मुलाखत घेतली. यावेळी छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी की शिवसेना असा प्रश्न विचारण्यात आला. इतकेच नाहीतर तुमच्या मनातून शिवसेना गेली नाही अजून असाही थेट प्रश्न त्यांना करण्यात आला. यावर छगन भुजबळ स्पष्टच म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना माझ्या मनातून अजून गेलेली नाही. शिवसेना कधीही संपणार नाही कारण, मराठी माणसाच्या मनात, गावात रूजली आहे. ते मतदान कुणालाही करतील, पण मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारीही शिवसेना होती आणि लोकांच्या मनाच्या कोपऱ्यात आजही शिवसेना आहे.