नितेश राणे यांच्या ‘त्या’ टीकेवर बाळासाहेब थोरात यांचे प्रत्युत्तर; म्हणाले…
VIDEO | लव्ह जिहाद प्रकरणावरून नितेश राणे आणि बाळासाहेब थोरात यांच्यात वार-पलटवार, बघा काय म्हणाले
मुंबई : लव्ह जिहाद प्रकरणावर बोलताना भाजप नेते नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘तुम्ही आमदार नंतर आहात, आधी तुम्ही एका हिंदू मुलीचे वडील आहात. बोलण्याआधी विचार करायला हवा. राज्यातील असंख्य मुलींचे आयुष्य लव्ह जिहादमुळे खराब होत आहेत हे कुणासोबतही घडू शकते. जितेंद्र आव्हाड आणि अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे असंख्य जिहादी विचारांच्या लोकांना समर्थन मिळत आहे’, असा आरोप नितेश राणे यांनी केला असून लवकरच लव्ह जिहादविरोधी कायदा येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर नितेश राणे यांच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, धर्माधर्मांत वाद कसा होईल, यासाठी काही लोकांचा प्रयत्न आहे.
Published on: Mar 21, 2023 05:10 PM
Latest Videos