कोरोना काळात गंगा नदीची स्थिती पाहून भाजपला आशीर्वाद का द्यावेत, जनतेला प्रश्न पडलाय: बाळासाहेब थोरात
काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्रात भाजप नेत्यांची जन आशीर्वाद यात्रा सुरु असली तरी राज्यातील जनतेचा आशीर्वाद महाविकास आघाडी सरकारला असल्याचं म्हटलं आहे.
भाजपची जन आशीर्वाद यात्रा निघालीय मात्र, जनतेचे आशीर्वाद हे महाविकास आघाडीसोबत आहेत. आगामी काळातील निवडणुका या सोबतच लढणार असल्याचं सुतोवाच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. भाजपची जन आशीर्वाद यात्रा निघालीय, मात्र लोकांचे आशीर्वाद हे महाविकास आघाडीसोबत आहेत. गेल्या 2 वर्षांपासून काम चांगले चाललेय, कोरोना आणि उत्तर प्रदेश मधील गंगा नदीची स्थिती पाहता आशीर्वाद यांना का द्यावेत हा जनतेला प्रश्न पडेल, बाळासाहेब थोरात यांनी टीका केलीय. तर, आगामी काळातील सर्वच निवडणूक महाविकास आघाडी सोबतच लढणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलंय.
Latest Videos