कंगनाचं संरक्षण आणि पुरस्कार पाहून गोखलेंनाही ‘पद्मश्री’ व्हायचंय दिसतंय; बाळासाहेब थोरातांचा जोरदार टोला
देशाच्या स्वातंत्र्याबद्दल आणि महात्मा गांधींवर टीका केल्यावर पद्मश्री मिळतो. संरक्षण मिळते. अभिनेत्री कंगना रणावतलाही ते मिळालं. तिचं संरक्षण आणि पद्मश्री पुरस्कार पाहून अभिनेते विक्रम गोखलेंनाही पद्मश्री व्हायचं दिसतंय, असा चिमटा काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढला.
अहमदनगर : देशाच्या स्वातंत्र्याबद्दल आणि महात्मा गांधींवर टीका केल्यावर पद्मश्री मिळतो. संरक्षण मिळते. अभिनेत्री कंगना रणावतलाही ते मिळालं. तिचं संरक्षण आणि पद्मश्री पुरस्कार पाहून अभिनेते विक्रम गोखलेंनाही पद्मश्री व्हायचं दिसतंय, असा चिमटा काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढला. नगर येथील एका कार्यक्रमात बोलताना बाळासाहेब थोरात यांनी अभिनेत्री कंगना रणावत, अभिनेते विक्रम गोखले आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
Latest Videos