Balu Dhanorkar : धानोरकर यांच्या निधनानंतर बाळासाहेब थोरात यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. ते 48 वर्षांचे होते. मागील तीन दिवसांपासून ते दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार घेत होते.
चंद्रपूर : काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. ते 48 वर्षांचे होते. मागील तीन दिवसांपासून ते दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना पित्ताशय आणि स्वादुपिंडाचा त्रास होत होता. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. दोनच दिवसांपूर्वी त्यांना नागपूरहून गुडगावला हलवण्यात आलं होतं. मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. बाळू धानोरकर यांच्यामागे पत्नी आमदार प्रतिभा, दोन मुले असा परिवार आहे. धानोरकर यांचे पार्थिव दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथे दुपारी 1.30 वाजता वरोरा येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे. चार दिवसांपूर्वीच त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते. पिता-पुत्राच्या लागोपाठ मृत्यूमुळे धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर त्यांच्या निधणाने हा काँग्रेससाठीही मोठा धक्का आहे. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्त्यांचे मोहोळ आणि भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी सांभाळला होता. त्यांची लोकप्रियता मतदार संघात होती. तर सतत कार्यरत राहणारं व्यक्तिमत्व होतं असेही थोरात म्हणाले.