राज ठाकरे यांच्या सभेला लोकं फक्त ऐकायला येतात – बाळासाहेब थोरात
"राजकारण हे विकासासाठी असलं पाहिजे आणि धर्म हे व्यक्तिगत असलं पाहिजे. पण दुर्दैवाने असं होताना दिसत नाही," अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली. राज ठाकरे यांची सभा लोकं फक्त ऐकायला येतात असंदेखील ते म्हणाले.
“राज्यघटनेने आपल्याला काही अधिकार दिले आहेत. परंतु ते राज्यघटनेच्या चौकटीत राहून आपल्याला ते करायचं आहे. दुर्दैवाने काही मंडळी सवंग अशा प्रकारचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतेय. माणसामाणसात भेद निर्माण करून, धर्मात भेद निर्माण करून, त्यावरून राजकारण करत आहेत. राजकारण हे विकासासाठी असलं पाहिजे आणि धर्म हे व्यक्तिगत असलं पाहिजे. पण दुर्दैवाने असं होताना दिसत नाही,” अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली. राज ठाकरे यांची सभा लोकं फक्त ऐकायला येतात असंदेखील ते म्हणाले.
Latest Videos