प्रचार ना रॅली…राजकीय कामात लहान मुलांचा वापर नाही; निवडणूक आयोगाची नियमावली नेमकी काय?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नियमावली जारी.... निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या नियमावलीनुसार निवडणूक प्रचारात किंवा निवडणूक रॅलीमध्ये लहान मुले आणि अल्पवयीन मुलांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
नवी दिल्ली, ५ फेब्रुवारी २०२४ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या नियमावलीनुसार निवडणूक प्रचारात किंवा निवडणूक रॅलीमध्ये लहान मुले आणि अल्पवयीन मुलांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. लहान मुलांना निवडणूक प्रचाराची पत्रक वाटप करण्यास सांगू नका तसेच पक्षाचे झेंडे हातात घेऊन मुलांना घोषणा द्यायला लावू नका, अन्यथा कारवाई करण्यात येईल अशी सक्त ताकीद निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे जर निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर करताना कुणी दिसलं तर त्यावर कारवाई तर होणारच मात्र हे निवडणूक नियमांचा भंगही ठरणार आहे. निवडणुकीत निवडणूक कामात लहान मुलांचा वापर करणं खपवून घेतलं जाणार नाही, असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट शब्दात म्हटले आहे.
Published on: Feb 05, 2024 05:08 PM
Latest Videos