Bandatatya Karadkar यांचं दारू पिऊन वक्तव्य, Rupali Patil यांचा आरोप | Wine Controversy |
बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) वडीलधारी व्यक्ती आहे. त्यांनी बोलताना भान बाळगायला हवं. सुप्रिया सुळे (Supriya Sule) या महिलांचे प्रश्न मांडणाऱ्या नेत्या आहेत. कोण दारू पिऊन पडतं, यापेक्षा त्यांनी वाइनला विरोध करावा, असं राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) म्हणाल्या.
बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) वडीलधारी व्यक्ती आहे. त्यांनी बोलताना भान बाळगायला हवं. सुप्रिया सुळे (Supriya Sule) या महिलांचे प्रश्न मांडणाऱ्या नेत्या आहेत. कोण दारू पिऊन पडतं, यापेक्षा त्यांनी वाइनला विरोध करावा. मात्र सुप्रिया सुळे यांचं नाव घेताना तारतम्य बाळगायला हवं. मी या घटनेचा निषेध करते, असं राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) म्हणाल्या. बंडातात्या कराडकरांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर कोर्टातून गुन्हा दाखल करणार, कोर्टातून 156-3 नुसार गुन्हा दाखल करणार, असं म्हणत रुपाली पाटलांनी आक्रमक भूमिका घेतली. बंडातात्यांचा पुतळा बनवला असून पुतळ्याला जोडो मारो आंदोलनही राष्ट्रवादीतर्फे करण्यात आलं. बंडातात्यांनी माफी मागितली म्हणजे संपलं का? असा सवाल करत काल बंडातात्या दारू पिऊन बोलले, असा रुपाली पाटलांनी आरोप केला. याविरोधात राष्ट्रवादीनं पुण्यातल्या ज्ञानेश्वर पादुका चौकात आंदोलन केलं.