Bandra terminus Stampede : मुंबईतील वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक एकवर चेंगराचेंगरी, नेमकं काय घडलं?

वांद्रे टर्मिन्सवर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 9 प्रवाशी जखमी झाले असून या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

Bandra terminus Stampede : मुंबईतील वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक एकवर चेंगराचेंगरी, नेमकं काय घडलं?
| Updated on: Oct 27, 2024 | 11:55 AM

मुंबईतील वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक एकवर चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रमुख स्थानकांपैकी एक असलेल्या वांद्रे टर्मिनसवरून सुटणारी वांद्रे-गोरखपूर एक्स्प्रेस पकडताना चेंगराचेंगरी झाल्याची घटना आज सकाळी घडली. एक्स्प्रेस पकडताना झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत 9 जण जखमी झाले आहेत. तर दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. छट पूजेसाठी उत्तरप्रदेशला निघालेल्या प्रवाशांची एकच गर्दी झाली आणि चेंगराचेंगरीमुळे ही घटना घडली. मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 5.56 वाजता वांद्रे टर्मिन्सच्या फलाट क्रमांक एकवर चेंगराचेंगरी झाली. वांद्रे टर्मिन्सवर प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर 22921 वांद्रे गोरखपूर एक्सप्रेस ही लागलेली होती. या ट्रेनमध्ये चढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली होती. यावेळी ट्रेनमध्ये चढत असताना मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत जखमी झालेले प्रवाशी साधारण 18 ते 30 वयोगटातील असून यामध्ये इंद्रजित सहानी आणि नूर मोहम्मद शेख यांची प्रकृती गंभीर आहे.

Follow us
समीर वानखेडे विधानसभा निवडणूक लढवणार? शिंदेंकडून हे 5 संभाव्य उमेदवार
समीर वानखेडे विधानसभा निवडणूक लढवणार? शिंदेंकडून हे 5 संभाव्य उमेदवार.
'विधानसभा लढतोय आणि मीच...', मलिक अपक्ष लढण्यावर ठाम, पण फायदा कोणाचा?
'विधानसभा लढतोय आणि मीच...', मलिक अपक्ष लढण्यावर ठाम, पण फायदा कोणाचा?.
सदा सरवणकरांचं तिकीट रद्द होणार? अमित ठाकरेंना महायुतीचा पाठिंबा पण...
सदा सरवणकरांचं तिकीट रद्द होणार? अमित ठाकरेंना महायुतीचा पाठिंबा पण....
भाजप अन् शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर, कोणाविरूद्ध कोण लढणार?
भाजप अन् शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर, कोणाविरूद्ध कोण लढणार?.
मुंबईतील वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक एकवर चेंगराचेंगरी, काय घडलं?
मुंबईतील वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक एकवर चेंगराचेंगरी, काय घडलं?.
वादग्रस्त वक्तव्य प्रकरणानंतर अजित पवार यांचा सुजय विखेंना फोन
वादग्रस्त वक्तव्य प्रकरणानंतर अजित पवार यांचा सुजय विखेंना फोन.
'अतिशय हिन, गलिच्छ भाषेत माझ्या मुलीवर...,' काय म्हणाले थोरात ?
'अतिशय हिन, गलिच्छ भाषेत माझ्या मुलीवर...,' काय म्हणाले थोरात ?.
वसंत देशमुख यांच्यावर कठोर कारवाई होणार? पोलीस अधिक्षक काय म्हणाले?
वसंत देशमुख यांच्यावर कठोर कारवाई होणार? पोलीस अधिक्षक काय म्हणाले?.
थोरात आणि विखे समर्थकांच्या संगमनेरमधील राड्याची केंद्राकडून दखल
थोरात आणि विखे समर्थकांच्या संगमनेरमधील राड्याची केंद्राकडून दखल.
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्यं अतिशय किळसवाणं - रोहित पाटील
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्यं अतिशय किळसवाणं - रोहित पाटील.