Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bandre कोर्टानं सुनावली Hindustani Bhau ला 3 दिवसांची पोलीस कोठडी

| Updated on: Feb 01, 2022 | 7:26 PM

हिंदुस्तानी भाऊने विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यास भडकावल्याचा आरोप करण्यात आला. कालच्या विद्यार्थी आंदोलनात पुढे आलेला हिंदुस्तानी भाऊ आता आणखी अडचणीत आला आहे. कारण हिंदुस्तानी भाऊला पोलिसांनी अटक करत कोर्टात हजर केलं आणि त्यांनंतर कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई : परीक्षा ऑनलाईन (Online Exam) घ्याव्या या मागणीसाठी काल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घराबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात हिंदुस्तानी भाऊचं (Hindustani Bhau) नाव पुढे आलं. हिंदुस्तानी भाऊने विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यास भडकावल्याचा आरोप करण्यात आला. कालच्या विद्यार्थी आंदोलनात पुढे आलेला हिंदुस्तानी भाऊ आता आणखी अडचणीत आला आहे. कारण हिंदुस्तानी भाऊला पोलिसांनी अटक करत कोर्टात हजर केलं आणि त्यांनंतर कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे हिंदुस्तानी भाऊबरोबर पोलीस काय करणार? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. विद्यार्थी आंदोलनापूर्वीचे हिंदुस्तानी भाऊचे काही व्हिडिओ व्हायरल झाल्याने भाऊच्या अडचणी वाढल्या आहेत. कालचं आंदोलन एवढं आक्रमक होतं की विद्यार्थ्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.