Bangladesh Crisis : आग बांगलादेशात, झळ भारताला; ‘या’ आव्हानांचा देश कसा सामना करणार?
बांगलादेशातील काही कट्टरवाद्यांनी हिंदू अल्पसंख्याकांची घरं आणि देवळांना टार्गेट केल्याची घटना घडली. काही भागातील विद्यार्थी संघटना हिंदुंच्या संरक्षणासाठी पुढे सरसावल्या आहेत मात्र अद्याप बांगलादेशात अराजकता असून भारत सरकार यांवर बारीक नजर ठेवून आहे.
शेख हसीना यांच्याविरोधात बांगलादेशात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. त्या सध्या तात्पुरत्या स्वरुपात भारताच्या आश्रयाला आहेत. तर दुसरीकडे बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या राज्यात भारतानं बंदोबस्त वाढवला आहे. आग बांगलादेशात लागली असली तरी त्यांच्या झळा भारताला पोहोचू नये, म्हणून सरकार पाऊलं टाकत आहे. भारतासाठी बांगलादेशातील संघर्ष महत्त्वाचा आहे. याचं कारण म्हणजे पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या पाच राज्यांच्या सीमा बांगलादेशासोबत आहेत. भारत सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवून बांगलादेशातील सुरू असलेल्या सध्यस्थितीवर चर्चा केली. या घडीला बांगलादेशातील स्थितीवर बारीक नजर असून लवकरच शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न व्हावे, असा सूर सर्वपक्षीय बैठकीतून पाहायला मिळाला. बांगलादेशात सध्या काय परिस्थिती आहे? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट