नागपूर राड्यामागे बांगलादेश कनेक्शन? हिंसा भडकवणारे 172 व्हिडीओ व्हायरल, फहीम खानसह आणखी एक मास्टरमाईंड समोर
नागपूर हिंसाचारामागे आता बांग्लादेश कनेक्शन असल्याचे समोर येत आहे. त्यासोबतच फहीम खान सह सय्यद अली हा सुद्धा एक माास्टरमाईंड असल्याचा संशय आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये आता बांग्लादेशी कनेक्शन समोर येत असल्याचे दिसते आहे आणि त्यासोबत फहीम खान सह सय्यद अली हा सुद्धा एक माास्टरमाईंड असल्याचा संशय पोलिसांना आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूर हिंसाचारात बांग्लादेश कनेक्शनचा मुद्दा समोर आल्याने एनआयए समांतर तपास करणार अशी सूत्रांची माहिती आहे. बांग्लादेशी दहशतवादी संघटनांचा नागपूर राड्यामध्ये सहभाग तपासामध्ये उघड झाल्याचे कळते आहे. बांग्लादेशमधून काही फंडींग झालं होतं का? याचाही पोलीस तपास करत आहेत अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. नागपूर राड्याला कारणीभूत ठरणारे व्हिडिओ बांग्लादेश सह इतर देशांमधील असल्याचे समोर आलंय. सायबर पोलिसांना हिंसाचार भडकवणारे तब्बल 172 व्हिडिओ सापडल्याचे समजते आहे. बांग्लादेश आणि इतर देशातील आयपी अॅड्रेसवरून व्हिडीओ व्हायरल झाल्याची माहिती आहे. आरोपी फहीम खानचा मोबाईल जप्त करून सायबर पोलिस तपास करणार. फहीम खानकडून भडकवणारे संदेश किती जणांना पाठवले याचा शोध घेतला जाणार आहे.
राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?
फहीम खान सह सय्यद अली हा सुद्धा हिंसाचार मागचा आणखीन एक माास्टरमाईंड असल्याचे समोर येते आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणात सय्यद असीम अलीचे नाव चर्चेत आहे. त्याच्या हालचालीवर तपास यंत्रणांची नजर आहे. सय्यद असीम अली मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा पदाधिकारी तो औरंगजेबाचा कट्टर समर्थक आहे. हिंदू नेत्याच्या हत्या प्रकरणाच्या आरोपात सय्यदला अटक झाली होती. हिंदू नेते कमलेश तिवारींनी मोहम्मद पैगंबराविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. कमलेश तिवारींची जीप कापण्याला बक्षीसची घोषणा सय्यदने केली होती. 2019 मध्ये कमलेश तिवारी यांची लखनऊमध्ये हत्या करण्यात आली. तिवारी हत्याकांडातील आरोपींनी सय्यद अलीशी बक्षीसासाठी संपर्क साधला होता. नागपूर एटीएसने सय्यद असीम अलीला अटक करून उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?

देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र

मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र

'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
