Nagpur Violence : नागपूर राड्यातील आरोपी फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा, पोलीस तपासातून खळबळजनक माहिती उघड
महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा थेट इशाराच विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाकडून देण्यात आला. यानंतर नागपुरात दोन गटांमध्ये झालेल्या राड्यादरम्यान जाळपोळ, तोडफोड करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
नागपूर हिंसाचार प्रकरणातील एक मोठी अपडेट समोर आली आहे. नागपूर राड्यातील आरोपी फहीम खानसह ५० आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर सायबर पोलिसांकडून रात्री फहीम खानसह ५० आरोपींवर देशद्रोहाचा दाखल करण्यात आला आहे. इतकंच नाहीतर पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या तपासातून एक मोठी माहिती उघड झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या राड्यात बांगलादेशी दहशतवादी संघटनांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. फहीम खानवर नागपुरात जमाव जमवल्याचा आरोप होता. नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचा मास्टरमाईंडचे नाव पहिल्यांदा समोर आले असून नागपुरात झालेल्या हिंसाचारामागे फहीम खान असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. फहीम खान याने लोकांना भडकवण्याचे काम केले. त्यानंतर ही हिंसा घडली. नागपूरमधील गणेशपेठ पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या दुसऱ्या तक्रारीमध्ये उघड झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष आहे. फहीम खान याचं शिक्षण इयत्ता दहावीपर्यंत झालंय. सध्या त्याचं वय हे ३८ वर्ष इतकं आहे. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष असलेल्या फहीम खान याने लोकसभेची निवडणूक लढवली होती.

56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर...

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर...

येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
