Special Report | भावी खासदारचे पोस्टर लावले की खोडसाळपणा? काय घडतंय पुण्यात?

Special Report | भावी खासदारचे पोस्टर लावले की खोडसाळपणा? काय घडतंय पुण्यात?

| Updated on: Apr 01, 2023 | 11:01 PM

VIDEO | गिरीश बापट यांना जाऊन तीनच दिवस उलटले अन् पुण्यात ‘या’ नेत्याचे झळकले बॅनर्स बघा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट

पुणे : पुण्यातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीवरून आता जोरदार पोस्टरबाजी सुरू झाली आहे. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र हे बॅनर आपण लावले नसल्याचे जगदीश मुळीक यांनी म्हटले आहे. पुण्यातील लोकसभेच्या पोटनिवडणूक काँग्रेस लढणार असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. त्यावरून ऐवढी घाई का? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. आता पुण्यात भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे भावी खासदार असे पोस्टर्स लावले आहे. गिरीश बापट हे पुण्याचे खासदार होते. त्यांच्या अकाली निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यात या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. मात्र, बापट यांना जाऊन तीन दिवस उलटले नाही तोच या जागेवर इच्छुकांनी दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या एका नेत्याची तर पुण्यात बॅनरबाजी सुरू झाली आहे. त्यावर या नेत्याचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. याप्रकारामुळे अजिप पवार अधिकच संतापल्याचे पाहायला मिळाले, बघा यासंदर्भातील टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट

Published on: Apr 01, 2023 10:58 PM