‘ठाणे, रिक्षा, चष्मा अन् दाढी…’, शिंदेंच्या व्यंगचित्राचे फ्लेक्स लावणं पडलं महागात, पुण्यातील ‘त्या’ बॅनरची चर्चा
ठाकरे गटाच्या शिवसैनिकाकडून कुणाल कामराच्या समर्थनार्थ पुण्यातील अलका चौकात मोठी बॅनरबाजी करण्यात आली होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्याविरोधात फ्लेक्स लावणं चांगलंच महागात पडलं आहे.
पुण्याच्या अलका चौकात स्डँडअप कॉमेडिअन कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आल्याचे काल पाहायला मिळाले. मात्र एकनाथ शिंदेंच्या व्यंगचित्राचे फ्लेक्स लावणं चांगलंच महागात पडलं आहे. कारण शिंदेंच्या व्यंगचित्राचे फ्लेक्स लावणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल सकाळी पुण्यातील अलका चौकात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काही फ्लेक्स लावले होते. या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचं व्यंगचित्र काढण्यात आलं होतं. त्याखाली ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी, गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का? असा मजकूर देखील छापण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते. एकनाथ शिंदे यांच्या सोबत कुणाल कामरा याचं देखील या बॅनरवर व्यंगचित्र काढण्यात आल्याचे दिसतेय. कुणाल कामरा याने दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि शिवसेना यासंदर्भात विडंबनात्मक गाणं तयार केलं होते. यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना चांगलीच खवळल्याचे पाहायला मिळाले. भडकलेल्या शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या शोच्या स्डुडिओची मोठी तोडफोड केली होती. तर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर उपहासात्मक गाणं करणाऱ्या कुणाल कामराच्या सोबत असल्याचं पत्रकार परिषदेत म्हटलं.

वकील अंजानच्या विरोधात ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी रवाना

लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल

'..शेवटी रक्ताचं नातं आहे', युगेंद्र पवारांनी स्पष्टच सांगितलं

खरं सांगायच तर.., थोपटेंचा भाजपात प्रवेश, सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण
