महोदय पाळणाघर... फडणवीसांच्या कडेवर शिंदे अन् अजितदादा, 'मनसे'चा महायुतीला चिमटा

महोदय पाळणाघर… फडणवीसांच्या कडेवर शिंदे अन् अजितदादा, ‘मनसे’चा महायुतीला चिमटा

| Updated on: Mar 12, 2024 | 5:26 PM

राज ठाकरे यांचा दौरा सुरू झालेला आहे. यावेळी त्यांनी मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही घेतल्या. दरम्यान, मानखुर्दमध्ये मनसेकडून महायुतीला चिमटा काढणारं बॅनर लावले आहे. या होर्डिंगवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे कार्टून्स

मुंबई, १२ मार्च २०२४ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच महायुती आणि महाविकास आघाडीसह मनसे कुठं मागं नाही. मुंबईतील मानखुर्द परिसरात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दौरा सुरू झालेला आहे. यावेळी त्यांनी मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही घेतल्या. दरम्यान, मानखुर्दमध्ये मनसेकडून महायुतीला चिमटा काढणारं बॅनर लावले आहे. या होर्डिंगवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे कार्टून्स दिसताय. या बॅनरवर देवेंद्र फडणवीस यांच्या कडेवर एक बाजूला अजित पवार आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे पाहायला मिळताय. तर महोदय पाळणाघर… आमच्याकडे घोटाळेबाज लेकरं सांभाळी जातील ? असं खोचक टोलाही लगावण्यात आलाय. यासोबत बाबा रे, विश्वास आता तुझ्यावर आहे, असं कोट असून त्याच्याबाजूला राज ठाकरेंच्या फोटो लावण्यात आलाय.

Published on: Mar 12, 2024 05:26 PM