पालिका निवडणुकीसाठी उमेदवार बायको पाहिजे, Aurangabad मध्ये इच्छुक उमेदवाराची बॅनरबाजी

पालिका निवडणुकीसाठी उमेदवार बायको पाहिजे, Aurangabad मध्ये इच्छुक उमेदवाराची बॅनरबाजी

| Updated on: Jan 30, 2022 | 2:03 PM

राज्यात सध्या वेगवगळ्या निवडणुका सुरु आहेत. जिल्हा बँक, महापालिकेच्या (Aurangabad Municipal Election) निवडणुकांमुळे वातावरण तापललेले आहे. या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षातील उमेदवार आपापल्या परीने जिंकण्यासाठी समीकरणे आखत आहेत.

राज्यात सध्या वेगवगळ्या निवडणुका सुरु आहेत. जिल्हा बँक, महापालिकेच्या (Aurangabad Municipal Election) निवडणुकांमुळे वातावरण तापललेले आहे. या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षातील उमेदवार आपापल्या परीने जिंकण्यासाठी समीकरणे आखत आहेत. काहीही झालं तरी निवडणूक जिंकायचीच असा निश्चय अनेकांनी मनाशी बांधला आहे. सध्या मात्र औरंगाबाद (Aurangabad) पालिका निवडणूक लढण्याची इच्छा बाळगणाऱ्या एका अवलियाची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा आहे. त्याला निवडणूक लढवायची इच्छा होती. मात्र लॉकडाऊनमध्ये तिसरे आपत्य झाल्यामुळे तो निवडणुकीसाठी उभा राहू शकत नाहीये. याच तरुणाने चक्क निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको (Wife) पाहिजे असे लिहलेले बॅनर संपूर्ण शहरभर लावले आहे. तरुणाच्या या बॅनरची सध्या महाराष्ट्रभर चर्चा होत आहे. रेमश विनायकराव पाटील असे तरुणाचे नाव आहे.

Published on: Jan 30, 2022 01:55 PM