भावी मुख्यमंत्रीच्या स्पर्धेत राज ठाकरे यांची एन्ट्री, वाढदिवसाच्यानिमित्त कुठं केली बॅनरबाजी?
VIDEO | मनसे अध्यक्ष राज ठाकरे होणार भावी मुख्यमंत्री? राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बॅनरबाजी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात भावी मुख्यमंत्री यावरून चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे, तर प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आपला नेता भावी मुख्यमंत्री हवा या आशयाचे पोस्टर्स देखील त्या त्या मतदारसंघात झळकवताना दिसतोय. अजित पवार, नाना पटोले भावी मुख्यमंत्री असे पोस्टरबाजी सुरू असताना आता या स्पर्धेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. तर राज ठाकरे यांच्या येत्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही बॅनरबाजी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तर या बॅनरवर राज्याला एक वेळ मुख्यमंत्री नसेल तरी चालेल, पण प्रत्येक राज्याला एक राज ठाकरे नक्की असावेत. हिंदू जननायक राजठाकरे यांना शुभेच्छा, असा आशय त्या बॅनरवर पाहायला मिळत आहे.