पेणचे बाप्पा समुद्रमोर्गे निघाले विदेश प्रवासाला, ३५०० गणेशमूर्ती रवाना होणार
VIDEO | २०२३ नव्या वर्षांतील तब्बल ३५०० गणेशमूर्ती येत्या दहा दिवसांत अमेरीका दुबई वेस्टडिअज साउथ आफीका देशात रवाना होणार
मुंबई : गणेशोत्सवाला अद्याप सहा महिने बाकी असले, तरी मूर्तिकार मात्र आत्तापासूनच तयारीला लागलेत. त्यातही परदेशात असलेल्या भारतीयांनाही बाप्पाचा पाहुणचार करता यावा, यासाठी भारतातून दरवर्षी हजारो गणपती बाप्पा परदेशात पाठवले जातात. बाप्पांचा हा प्रवास लांबचा असल्यानं अगदी सहा महिने आधीपासूनच गणपती बाप्पांच्या परदेशवारीला सुरुवात होते. यंदा सर्वात आधी बदलापूरच्या चिंतामणी क्रिएशन्सकडून कॅनडा देशात गणपती बाप्पा रवाना झाले आहेत. यानंतर आता पेण मधील बाप्पा अमेरीका साउथ आफ्रीका दुंबई वेस्टइंडीजला निघाले आहेत. गणेशोत्सवासाठी परदेशी अनिवासी भारतीयांकडून गणेशमूर्तींची मागणी धूमधडाक्यात सुरु झाली आहे. २०२३ नव्या वर्षांतील तब्बल ३५०० गणेशमूर्ती येत्या दहा दिवसांत अमेरीका साउथ आफ्रीका दुंबई वेस्टइंडीज देशात रवाना होणार आहेत. जेएनपीटी बंदरातून समुद्र मार्गे शिपमधून या बाप्पांच्या मूर्ती मागणीनुसार त्या त्या देशात रवाना होणार आहेत.