Baramati Assembly : विधानसभेलाही पवार vs पवार? नणंद-भावजयीच्या लढतीनंतर आता काका-पुतण्यामध्ये लढत? कोणाला उमेदवारी?

Baramati Assembly : विधानसभेलाही पवार vs पवार? नणंद-भावजयीच्या लढतीनंतर आता काका-पुतण्यामध्ये लढत? कोणाला उमेदवारी?

| Updated on: Jun 11, 2024 | 3:19 PM

Baramati Assembly Election 2024 नणंद भावजयीच्या लढतीनंतर आता काका - पुतण्यामध्ये लढत होणार असल्याची चर्चा आहे. कारण आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, अशी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे मागणी केली आहे. यासह युगेंद्र पवार यांना बारामतीतून विधानसभेची उमेदवारी द्या, अशीही मागणी कार्यकर्त्यांनी केली

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांचा गट आणि अजित पवार यांचा गट असे दोन गट तयार झाले. यानंतर इतिहासात पहिल्यांदाच बारामतीमध्ये पवार विरूद्ध पवार असा सामना लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने रंगल्याचे पाहायला मिळाला. त्यामुळे राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. यंदाच्या लोकसभेत नणंद-भावजय असा सामना रंगला होता. यामध्ये शेवटी नणंदेचा अर्थात सुप्रिया सुळेंचा विजय झाला तर भावजय सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. नणंद भावजयीच्या लढतीनंतर आता काका – पुतण्यामध्ये लढत होणार असल्याची चर्चा आहे. कारण आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, अशी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे मागणी केली आहे. यासह युगेंद्र पवार यांना बारामतीतून विधानसभेची उमेदवारी द्या, अशीही मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. पुण्यातील गोविंदबागेत शरद पवार यांची कार्यकर्त्यांनी भेट घेत आम्हाला दादा बदलायचा आहे, अशी मागणी केली आहे.

Published on: Jun 11, 2024 03:17 PM