बारामतीचा दादा कोण? अजित पवार की युगेंद्र पवार? विधानसभेची लढाई पुतण्यावरून तापली
बारामतीत अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार यांच्यात पवार vs पवार अशी लढत होतेय. विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा कालचा शेवटचा दिवस होता. अजित पवार आणि शरद पवार या दोघांनीही आपली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा बारामतीत घेतली.
विधानसभा निवडणुकीला बारामतीचं काय होणार? याकडे बारामतीकरांचंच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. बारामतीत अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार यांच्यात पवार vs पवार अशी लढत होतेय. विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा कालचा शेवटचा दिवस होता. अजित पवार आणि शरद पवार या दोघांनीही आपली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा बारामतीत घेतली. यावेळी अजित दादा आणि शरद पवार आमने-सामने आलेत. शरद पवार यांनी यावेळी पुढच्या पिढीची आवश्यकता आहे, असं म्हणत अजित पवारांना इशारा दिला. अजित पवारांच्या सभेत अजित दादांच्या आईचं पत्र देखील वाचून दाखवण्यात आलं. ज्यात दादांवर अन्याय झाल्याचा उल्लेख आहे. दुसरीकडे काल शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना बारामती येथील एका टेक्स्टाईल पार्कमध्ये प्रवेश करण्यासाठी अडवलं. तो मुद्दाही प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काढण्यात आला. त्यावरून सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवर निशाणा साधला. याच मुद्द्यावर अजित पवारांनीही भाष्य केलं. बघा नेमकं काय म्हणाले?