‘त्या’ वक्तव्यानं माझं वाटोळं झालं, तेव्हापासून ठरवलं… अजितदादांच्या वक्तव्याची चर्चा
त्यावेळी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद द्यायला सांगितलं होतं. यावेळी साहेबांनी सांगितलं घ्यायचं नाही. काँग्रेसला द्यायचं...आपण दिलं वास्तविक तेव्हा छगन भुजबळ, आर आर पाटील मुख्यमंत्री झाले असते. जर माझ्या नशिबात असतं तर मीही मुख्यमंत्री झालो असतो, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.
२००४ साली राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी होती. छगन भुजबळ, आबा पाटील किंवा मला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं, असं अजित पवार म्हणाले. पण शरद पवार यांनी त्यावेळी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद द्यायला सांगितलं होतं. यावेळी साहेबांनी सांगितलं घ्यायचं नाही. काँग्रेसला द्यायचं…आपण दिलं वास्तविक तेव्हा छगन भुजबळ, आर आर पाटील मुख्यमंत्री झाले असते. जर माझ्या नशिबात असतं तर मीही मुख्यमंत्री झालो असतो, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. तर अजित दादा पुढे असेही म्हणाले, साहेबांचा शब्द अंतिम होता. साहेबांच्या कारकीर्दीत ते जे म्हणतील ते करण्याकरता मी मागे पुढे पाहिलं नाही. तर धरणाबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्याने माझं वाटोळं झालं. तेव्हापासून मी शब्द जपून वापरतो आणि तेव्हापासून ठरवलंय चांगलं बोलायचं, असंही अजित पवार यांनी म्हटलं. बारामतीतील प्रचारसभेत अजित पवार यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान, बारामतीत अजित पवार यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.