मला तर शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
तीन वेळा खासदार राहिले, नेमकं काय केलं? '२०२४ पर्यंत भोर वेल्हा परिसरात एमआयडीसी आणणार असं म्हणणारे आता पुन्हा मत मागताय. मला तर शरमच वाटली असती', असे म्हणत अजित दादांनी सुप्रिया सुळे यांच्यावर काम न केल्याचा आरोपच केलाय.
अजित पवार यांनी पुण्यातील अंबेगावतून सुप्रिया सुळे यांच्यावर थेट निशाणा साधला. तीन वेळा खासदार राहिले, नेमकं काय केलं? ‘२०२४ पर्यंत भोर वेल्हा परिसरात एमआयडीसी आणणार असं म्हणणारे आता पुन्हा मत मागताय. मला तर शरमच वाटली असती’, असे म्हणत अजित दादांनी सुप्रिया सुळे यांच्यावर काम न केल्याचा आरोपच केलाय. मिमिक्री करत अजित पवारांना सुप्रिया सुळे यांनी विकास कामांवरून सवाल केले तर माझ्या तीन टर्मच्या वेळी अजित पवारच सोबत होते, असे प्रत्युत्तर दिलंय. सुप्रिया सुळे यांनी नुकतीच विकासकामांची एक पुस्तिका छापलीये. खासदारकीच्या काळात काय काय केलं. हे त्यातून सांगण्यात आलंय. तर मी केलं मी केलं…असं म्हणत माझीच कामं त्या पुस्तिकेत छापली. पण पुणे भोर वेल्ह्यात काय काम केली ते सांगा… असा सावलच अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना करत त्यांची मिमिक्री केलीये. बघा स्पेशल रिपोर्ट…