तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला कुणाला?
ज्याला जिल्हा परिषद तिकीट देण्यास साहेबांनी विरोध केला त्याला मी तिकीट दिलं. अशांनी माझ्या नादी लागावं, तू ज्या स्कुलमध्ये शिकतो त्याचा हेडमास्तर मी आहे, असं वक्तव्य करत अजित पवारांनी रोहित पवारांवर खोचक टीका केली आहे. काही जण पहिल्यांदा आमदार झालेत, तरी इतकं वटवट करायला लागलेत. त्यांनी माझ्यावर 70 हजार कोटींचे आरोप केलेत. असं अजित पवार म्हणत त्यांनी रोहित पवारांचं नाव न घेता हल्लाबोल केला.
इंदापूर येथे अजित पवार बोलत असताना त्यांनी रोहित पवारांवर हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार म्हणाले, ज्याला जिल्हा परिषद तिकीट देण्यास साहेबांनी विरोध केला त्याला मी तिकीट दिलं. अशांनी माझ्या नादी लागावं, तू ज्या स्कुलमध्ये शिकतो त्याचा हेडमास्तर मी आहे, असं वक्तव्य करत अजित पवारांनी रोहित पवारांवर खोचक टीका केली आहे. पुढे अजित पवार असेही म्हणाले, त्याच्यावर मी बोलणार नाही आणि मी त्याला मोठा करणार नाही. पण आम्ही काही बोललो नाही तर लोकांना वाटतं कुठंतरी पाणी मुरतंय त्यामुळे बोलावं लागतं. काही जण पहिल्यांदा आमदार झालेत, तरी इतकं वटवट करायला लागलेत. त्यांनी माझ्यावर 70 हजार कोटींचे आरोप केलेत. 70 हजार कोटी दाखव त्यातील 35 कोटी तू घेऊन जा, असे म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांना खोचक टोला लगवाला आहे. अजित पवार म्हणाले, ते म्हणतात 70 हजार कोटी आहेत. मी म्हणतो 69 हजार कोटी तुला आणि मी 1 हजार कोटी मला… असं म्हणत अजित पवारांनी मिश्किल भाष्य करत अजित पवारांची खिल्ली उडवली.

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल

दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय

साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा

मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
