मतदान करायला गेले पण EVM मशीनवर 'कमळा'चं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त, म्हणाले...

मतदान करायला गेले पण EVM मशीनवर ‘कमळा’चं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त, म्हणाले…

| Updated on: May 07, 2024 | 1:51 PM

लोकसभा निवडणुकीचा आज तिसरा टप्पा पार पडतोय. आज देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. आज तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगले या ११ जागांवर मतदान

ईव्हीएम मशीनमध्ये भाजपच्या कमळांच निवडणूक चिन्ह नसल्याने एक मतदार आजोबा संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. बारामतीच्या पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण या शाळेत हा प्रकार घडल्याची माहिती मिळतेय. भाजपच्या पारंपारिक मतदार असलेल्या आजोबांनी हा संताप व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीचा आज तिसरा टप्पा पार पडतोय. आज देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. आज तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगले या ११ जागांवर मतदान होतंय. या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम मशीनमध्ये कमळांच चिन्ह नसल्याने एकमतदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मतदान करायला गेलो तर मतपत्रिकेवर (ईव्हीएम मशीन) कमळाचं चिन्ह नसल्याचे त्यांनी सांगितले. बघा काय म्हणाले मतदान करण्यास गेलेल आजोबा?

Published on: May 07, 2024 01:51 PM