पवार कुटुंब पुन्हा एकत्र होणार की नाही? रोहित पवारांच्या आईनं स्पष्टच सांगितलं, जखमा खूप झाल्यात…
फुटीनंतर बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच पवार विरूद्ध पवार असा समाना लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळाला तर बारामतीमध्ये पवार कुटुंबातील नणंद-भावजय आमने-सामने आल्यात. या लढतीत सुप्रिया सुळेंचा दणदणीत विजय झाला तर सुनेत्रा पवार यांचा या निवडणुकीत पराभव झाला.
लोकसभा निवडणुकीदरम्यान बारामतीच्या लढतीकडे सर्वांच लक्ष लागलेले होते. राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आणि आरोप-प्रत्यारोपांच राजकारण तेव्हापासूनच सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, या फुटीनंतर बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच पवार विरूद्ध पवार असा समाना लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळाला तर बारामतीमध्ये पवार कुटुंबातील नणंद-भावजय आमने-सामने आल्यात. या लढतीत सुप्रिया सुळेंचा दणदणीत विजय झाला तर सुनेत्रा पवार यांचा या निवडणुकीत पराभव झाला. या विजयानंतर पवार कुटुंबातील सून आणि आमदार रोहित पवार यांची आई सुनंदा पवार यांनी मोठं विधान केलंय. ‘पवारांचं 70 टक्के कुटूंब हे शरद पवार साहेबांसोबत आहे आणि वैचारिक भूमिका बदलल्यामुळे एक कुटुंब बाजूला गेलं आहे. एरवी सण-समारंभाला एकत्र येणं ठीक आहे पण आता वैचारिक मतभेद एवढे झाले आहेत, मन एवढी दुखावली आहेत, भाषेचा स्तर खूप खाली गेला आहे, त्यामुळे जखमा खूप झालेल्या आहेत, त्यामुळे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणं शक्य नाहीये’, असं त्यांनी म्हटलं तर अजितदादा ज्या भूमिकेच्या बाजूला गेलेत, ते अजितदादांना एकत्र येऊ देणार नाहीत, असं ठामपणे सांगितलं.