मृत्यूचा संकेत मडक्यातून… अजितदादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं? मडकं फोडल्यानं बारामतीतील राजकारण तापलं
सुनेत्रा पवार या विजयी झाल्या नाहीत तर आपल्या डोळ्यात पाणी येईल. आणि पाण्याचा प्रश्न निर्माण होईल असं सांगताना त्यांनी मडकं फोडलं. मतदानाच्या आधल्या दिवशी अजित पवार यांच्या कार्यकर्त्यानं मडकं फोडल्याने बारामतीतील राजकीय राजकारण तापलं आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
बारामतीत आज मतदान होत आहे. मात्र या मतदानाच्या आधल्या दिवशी अजित पवार यांच्या कार्यकर्त्यानं मडकं फोडल्याने बारामतीतील राजकीय राजकारण तापलं आहे. मडकं कधी फोडता हे माहित नाही का? असा सवाल रोहित पवार यांनी केला. तर आपल्याला याची कल्पना नसून कोणाचाही अवमान करायचा नाही, असं अजित पवार म्हणाले. माळेगावच्या एका छोट्या सभेत मडके फोडणारे हे आहे अजित पवार गटाचे पदाधिकारी रविराज तावरे… सुनेत्रा पवार या विजयी झाल्या नाहीत तर आपल्या डोळ्यात पाणी येईल. आणि पाण्याचा प्रश्न निर्माण होईल असं सांगताना त्यांनी मडकं फोडलं. रोहित पवारांच्या नंतर जितेंद्र आव्हाड यांनीही ट्वीट केलंय आणि ही अघोरी विद्या असल्याचे म्हटलंय. जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं काय केलं ट्वीट… बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: May 07, 2024 10:08 AM
Latest Videos