शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान ५० वर्षात पहिल्यांदा बदललं, बारामतीत नेमकं काय घडलं?

शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान ५० वर्षात पहिल्यांदा बदललं, बारामतीत नेमकं काय घडलं?

| Updated on: May 05, 2024 | 11:19 AM

शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान ५० वर्षांत पहिल्यांदा बदललं आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हापरिषद, पंचायत समिती किंवा नगर परिषदेची निवडणूक असो शरद पवार याच मैदानावर नेहमी सभा घेतात. मात्र यंदा शरद पवार यांना याच मैदावर सभा घेता येणार नाही. काय आहे कारण?

देशभरात येत्या ७ तारखेला लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यामुळे आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. बारामती लोकसभा मतदार संघात सुद्धा तिसऱ्या टप्प्याच मतदान होणार आहे. दरम्यान, या लोकसभा मतदार संघात अत्यंत चुरशीची लढत होणार आहे. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे या जरी निवडणुकीच्या रिंगणात असल्या तरी खरी लढाई ही बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी आहे. आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा ही बारामती मधील मिशन हायस्कुलच्या मैदानात पार पडत आहेत. या सभेची तयारी सुरु आहे. तर शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान ५० वर्षांत पहिल्यांदा बदललं आहे. बारामतीतील मिशन बंगल्याचे मैदान यंदा अजित पवारांना मिळालंय. लोकसभा, विधानसभा, जिल्हापरिषद, पंचायत समिती किंवा नगर परिषदेची निवडणूक असो शरद पवार याच मैदानावर नेहमी सभा घेतात. मात्र यंदा हे मैदान अजित पवारांनी आधीच आरक्षित केले आहे.

Published on: May 05, 2024 11:18 AM