भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत
भावकीवरून गाजलेली निवडणूक आता भावूक आणि मिमिक्रीने चर्चेत आहे. शरद पवारांवर बोलताना काल रोहित पवार भावूक झालेत आणि रोहित पवार यांच्या रडण्याची अजित पवारांनी मिमिक्री केल्यानंतर सुनेत्रा पवारांच्या रडण्याचा व्हिडीओ विरोधकांनी व्हायरल केला.
भावूक भावकीनंतर आता मडकं आणि मिमिक्रीचा वाद बारामतीत चांगलाच चर्चेत आहे. अजित पवार यांच्यानंतर उदयनराजे भोसले यांनी केलेली मिमिक्री सोशल मीडियावर चांगलच चर्चेत आहे. भावकीवरून गाजलेली निवडणूक आता भावूक आणि मिमिक्रीने चर्चेत आहे. शरद पवारांवर बोलताना काल रोहित पवार भावूक झालेत आणि रोहित पवार यांच्या रडण्याची अजित पवारांनी मिमिक्री केल्यानंतर सुनेत्रा पवारांच्या रडण्याचा व्हिडीओ विरोधकांनी व्हायरल केला. रडून प्रश्न सुटत नसतात म्हणून भावनिक होऊ नका. असं आवाहन अजित पवार करताय. मात्र २०१९ ला भाजपाच्या आरोपानंतर ईडीची नोटीस आल्यानंतर कोण रडत होतं. तेव्हा आम्ही त्यांची खिल्ली उडवली होती का? असा सवाल रोहित पवार यांनी अजित पवारांना विचारलाय. मिमिक्रीनंतर रोहित पवार यांनी मडकं आणि सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावरून अजित पवारांनी चांगंलं लक्ष्य केलं. बघा केला हल्लाबोल?