सुनेचे दिवस येतात, किती दिवस बाहेरचे… शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांचा सवाल
. शरद पवार यांनी केलेल्या विधानानंतर अजित पवारांनी सवाल उपस्थित केलाय. ही भावकीची निवडणूक नाही, असं आवाहन जरी अजित पवारांनी केलं असलं तरी बारामतीतील निवडणूक अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील वादामुळे चर्चेत आहे. बघा दोघांमध्ये नेमका वाद काय आहे?
बारामतीमध्ये सून आणि लेकीवरून वाद अद्याप सुरूच आहे. शरद पवार यांनी केलेल्या विधानानंतर अजित पवारांनी सवाल उपस्थित केलाय. ही भावकीची निवडणूक नाही, असं आवाहन जरी अजित पवारांनी केलं असलं तरी बारामतीतील निवडणूक अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील वादामुळे चर्चेत आहे. अजित पवारांच्या विधानावर शरद पवार यांनी उत्तर देताना मूळ पवार आणि बाहेरचे पवार म्हणत उत्तर दिल्याने वाद सुरू झालाय. सुनेत्रा सून असल्याने त्यांचं अडनाव पवार आहे तर सुप्रिया मुलगी असल्याने त्यांचं अडनाव सुळे आहे. यावर ज्यांची द्विधा मनस्थिती असलेल्या मतदारांनी जिथं पवार नाव असेल त्याला मतदान करा, असं आवाहन अजितदादांनी केलं. त्यावर शरद पवारांनी मूळ आणि बाहेरचे पवार असं उत्तर दिलं. शरद पवार यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातच नणंद-भावजय यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे भावकीचा वाद सुरूच असल्याचे बघायला मिळत आहे. बघा दोघांमध्ये नेमका वाद काय आहे?