‘सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे 4 दिवस…’, अजितदादांचा शरद पवारांना खोचक टोला
सुनेत्रा पवार या मूळ पवार नसल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. यावरून अजित पवार यांनी पलटवार केला होता. तर शरद पवार यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतल्याचं स्पष्ट केलं. आपण तसं बोललोच नाही, असं शरद पवारांनी म्हटलं. मात्र आज पुन्हा अजित पवार यांचा शरद पवार यांना खोचक टोला
शरद पवार यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातच नणंद-भावजय यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे भावकीचा वाद सुरूच आहे. सुनेत्रा पवार या मूळ पवार नसल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. यावरून अजित पवार यांनी पलटवार केला होता. तर शरद पवार यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतल्याचं स्पष्ट केलं. आपण तसं बोललोच नाही, असं शरद पवारांनी म्हटलं. मात्र आज पुन्हा अजित पवार यांनी शरद पवार यांना खोचक टोला लगावल्याचे पाहायला मिळत आहे. सासूचे संपले 4 दिवस… आता सुनेचे 4 दिवस येऊद्या, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे. 40 वर्ष झाली तरी बाहेरचे म्हणत आहेत, असंही खोचक भाष्य अजित पवार यांनी शरद पवारांवर केलं. ही वडीलधारी जरा, जुना काळ आठवत असेल, तर त्यांना म्हणा, जुना काळ आता थोडा बाजूला ठेवा. आता नवीन काळ बघा. आता सासूचे चार दिवस संपले, आता सूनेचे चार दिवस येऊद्या, असं सांगाना. की फक्त सासू-सासू-सासू, मग सुनेनं फक्त बघत बसायचं? बाहेरची-बाहेरची-बाहेरची, असं कुठं असतं का राव? असतं का? असा सवाल अजित पवारांनी शरद पवारांना केलाय.